VaishnaviVadhuvar

VaishnaviVadhuvar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VaishnaviVadhuvar, Chandra pushp apartment, Aurangabad.

06/02/2024

मंगळ - मंगल आहे.

तरीही विवाह जमवण्यातील अडथळा अज्ञानाने ठरतोय साप समजून दोरी धोपटणे असा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. निमहकीम खतरे जान या म्हणीप्रमाणे अर्धवट ज्ञान हे विनाशाला कारण असते.

विवाहोत्सूक वधु-वरांचे आई वडिल पालक मंगळाचा बागुलबुवा करतात. एखाद्याला मंगळ आहे ह्याची पडताळणी स्वत:च करतात. करणे चुक नाही पण त्याचे योग्य ज्ञान घ्या व मग करा.

दूसरा भाग मंगळी पत्रिकेला मंगळीच पत्रिका लागते असे ही नाही एक पत्रिका मंगळी असल्यास दुसऱ्या पत्रिकेतील ग्रहस्थिती जर पुरक असेल तर विवाह जमवता येतो. यासाठी फक्त मंगळी पत्रिका अशा पत्रिकेशी जुळते ज्या मध्ये पत्रिका मंगळी नसली तरी चालेल पण त्या दुसऱ्या पत्रिकेत शनि 1-4-7-8-12-29 स्थानी असावा किंवा गुरु/शुक्र/चंद्राची दृष्टी सप्तम स्थानावर असावी. तसेच ज्या पत्रिकेत मंगळ 1-4-7-8-12 या स्थानी असेल पण तो प्रथमात मेषेचा/चतुर्थात वृश्चिकेचा /सप्तमात मकरेचा / अष्टमात सिंहेचा/ द्वादशात धनु राशीचा असल्यास ती पत्रिका मंगळी नसते. तसेच जर मंगळ मिथून / कन्या राशीत असल्यास मंगळ दोष नसतो.

जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती मंगळीच असतात. त्यामुळे मंगळी पत्रिका ही श्रेष्ठ पत्रिका असते हे ही विसरु नये.

दुसरा मुद्दा नाडी दोषाचा. एक नाड येत असली तरी त्या पत्रिकेचा सुक्ष्म अभ्यास केल्यास जर नक्षत्रांच्या/ त्यांच्या चरणांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्यातुन नाडी दोष खरेच आहे का? अन्यथा वर वर दिसणारा नाडी दोष प्रत्यक्षात नसतोच हे ही दिसून येते. तरी नाडी दोषामुळे पत्रिका / स्थळ टाळण्याआधी त्याचा सुक्ष्म अभ्यास उच्च शिक्षित ज्योतिषाकडुन पडताळणी आवश्यक ठरते. याचे भान प्रत्येकाने ठेवावे.

"शुभंभवतू"

ज्योतिष्यशास्त्री - प्रमोद सुलाखे B.E.(Civil)

ज्योतिष्टशास्त्री - सौ. छाया सुलाखे (D.M.)

M.A.Vedang Jyotishi
Diploma in Vastu Shastra
9028510765 / 9881734582 / 9763301953
[email protected]

05/03/2022

उच्चशिक्षित ब्राह्मण वधू वरांसाठी सोपी कार्यपद्धती त्वरित निवड शक्य,
वैष्णवी वधुवर सुचक केंद्र,
चंद्रपुष्प संकुल, न्यू श्रेया नगर, काल्डा कॉर्नर, औरंगाबाद
संपर्क:-
सीमा सराफ
9421545761 / 9422201243

26/12/2017

सहज सुचलं म्हणून:"सातत्य".
मित्रहो नमस्कार,
एखादी चांगली गोष्ट जी आपली आयुष्यात सतत ऊर्जा निर्माण करते आणि तिची पुनरावृत्ती व्हावी असं वाटणं व त्यांत आपला सहभाग आवश्यक असणं म्हणजे सातत्य.ज्यांत व्यायाम,चांगल्या पुस्तकांचं वाचन,आर्थिक नियोजन,सुसंवाद अशा गोष्टी येत असाव्यात. संगीतामध्ये ह्यालाच बहुतेक "रियाज"म्हणत असावं.ह्याच (सातत्य)शब्दाचा अंगिकार किंवा तंतोतंत पाळणं माझ्या सारख्याला जमत नाही.अगोदर भावनेतून आरंभी शूरपणा अंगांत जोरात येतो आणि आपणच आपल्या सोयीला जमेल तसं वागतो.परिणाम सातत्य न राहिल्याने कोणत्याही उद्दिष्टा जवळ पोहोचण्यास उशीर होतो. त्यामागे सुटका करण्यासाठी बऱ्याच कारणांचा अकारण घ्यावा लागतो.मग पदरी कांहींच पडत नाही.मग कधी परिस्थितीला दोष,कधी माझं कांहींच असं म्हणून स्वतःला निर्दोष सिध्द करता येत नाही.खरा प्रश्न आहे तो आपण सातत्य "न"राखण्याचा.
कारण ते राखणं म्हणजे आयुष्याच्या यज्ञात परिश्रमांच्या समिधा टाकाव्या लागतात. त्या टाकतांना नेहमी आपल्या मनासारखेच होईल हे सांगता येत नाही.हे सर्व करत असतांना सभोवतालची परिस्थिती सुध्दा तुमची अनेकांगी परीक्षा घेत असते.परिणामी आपण नेहमी कोण चुकलं हेच सातत्यानं पहात असतो.काय चुकलं ह्याचा विचार सुध्दा आपल्या आसपास फिरकत नाही.कारण जेंव्हा "काय"चुकलं ह्याची शहनिशा केली जाते तेंव्हा आपसूकच आपण त्यांत गोवले जातो तेच आपल्याला नको असतं. जेंव्हा काय चुकलं ह्याचा सातत्याने निर्मळ मनाने शोध घेतला तर आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी जगण्यास सुलभ होतील.मग त्यात तडजोड आली,संयम आला,आर्थिक नियमन आलं,नियमित व्यायाम आला. मलातरी वाटतं हाच सातत्याचा अंगिकार असावा. त्याने आपण कुठं कमी पडतो हे लक्षांत येतं आणि तो कमीपणा दूर करण्यासाठी कोणते सातत्याने प्रयत्न करावे ह्याची सुद्धा आपल्याला सतत दखल घ्यावी लागेल.
आपला सहज घेण्याचा स्वभाव म्हणजे चलता है वृत्ति ही सातत्याचं सावत्र भावंडं तेच भावंड आपल्याला अधिक जवळचं वाटायला लागलं तर सातत्य ह्या शब्दाचा काय अर्थ राहील?ह्या चलता है वृत्तीनं आपण कोणाची नाही तर आपलीच स्वतःची फसगत करून घेतो आणि परिस्थितीला दोष देतो असं मलातरी वाटतं.
बघा पटतंय कां?
आपल्या प्रतिक्रियेची नेहमीच वाट पहात असतो.

15/08/2017

'लग्न' म्हणजे काय रे भाऊ ..?

'लग्न ' म्हणजे खूप धमाल, साड्या -दागिणे, शॉपिंग, मस्ती, आहेर, मानपान आणि बरंच काही. 'लग्न 'हा शब्द उच्चारताच हेच सगळं येतं ना तुमच्याही डोळ्यासमोर? तुमच्या आमच्या प्रत्येकाच्याच मनात, 'माझं लग्न असं असेल, तसं असेल ' असे कितीतरी स्वप्नांचे मनोरे आपण रचलेले असतात . अगदी खूप आधीपासून .. त्यात गैर काहीच नाही; पण आपल्या आयुष्यातल्या या सगळ्यात महत्वाच्या निर्णयाचा आपण सगळेच खूप वरवर विचार करतो किंवा फक्त एक 'समारंभ ' म्हणून विचार करतो असं नाही वाटत तुम्हाला ?
'शादी का लड्डू जो खाए वो पछताए और जो न खाए वो भी पछताए' वगैरे घासून गुळगुळीत झालेले डायलॉग्ज आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ असतात. 'एकदा का मुला/मुलीच लग्न लावून दिलं की आम्ही मोकळे ' अशी सहसा पालकांची मनोवृत्ती असते; तर मुला-मुलींच्या लग्नाबद्दलच्या कल्पना या सहसा चित्रपटांत दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींवर बेतलेल्या असतात. (पण या मजा -मस्ती ,समारंभनंतरच खऱ्या अर्थाने सुरु होणाऱ्या 'लग्न ' नावाच्या प्रकरणावर भाष्य करायचं धाडस या चित्रपटांमधे सहसा नसतंच. ) पालकांसाठी 'लग्न ' हे डोक्यावरच ओझं असतं , तर मुलांसाठी हवेत तरंगणारा एक 'mysterious गुलाबी फुगा !'
या सगळ्या भानगडीत 'लग्न म्हणजे नक्की काय ?', 'माझ्या लग्नाच्या संकल्पना काय आहेत ?', 'मला या नात्यातून नक्की काय अपेक्षित आहे ' याचा सखोल विचार केलाच जात नाही. मग हळू हळू घरच्यांकडून, समाजाकडून 'लग्नाचं pressure' वाढत जातं आणि मग अचानक आपण 'वधु /वर संशोधन ' मोहिमेत उडी घेतो . अभ्यास न करता परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्या सारखे ! 'निकाल ' लागायचा तो लागतोच ..
थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच कि , वधु /वर संशोधनास सुरुवात करण्याआधी 'लग्न म्हणजे नक्की काय ?', 'मला या नात्यातून नक्की काय अपेक्षित आहे ' याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. एखाद्यासाठी लग्न म्हणजे समानतेवर आधारित नातं असेल, कोणासाठी ती एक support system असेल तर आणखी कोणाला त्यातून companionship अभिप्रेत असेल. व्यक्तिगणिक लग्नाची संकल्पना आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतील; पण आपल्याला या नात्यातून नक्की काय अभिप्रेत आहे याचा सखोल आणि सुस्पष्ट विचार आधीच केलेला असेल तर मनासारखा जोडीदार शोधण्यात नक्कीच मदत होईल . विचारांचा गुंता, निर्णय घेतानाची दोलायमानता टाळता येईल. पालकांनीही नुसताच लग्नासाठीचा तगादा न लावता मुलांशी मोकळेपणाने चर्चा करत, 'लग्न ' हि संकल्पना समजावून घेण्यात त्याबाबद सखोल विचार करण्यात मुलांची मदत करायला हवी .
चला तर मग…विचार स्वतःच्या मनाला प्रश्न ," लग्न म्हणजे काय रे भाऊ ?"-
विभावरी देशपांडे प्रभू

Cover photos 22/07/2017
Photos from VaishnaviVadhuvar's post 22/07/2017
14/07/2017

संचालकाचे मनोगत
कागदावर जुळलेली पत्रीका आणि काळजावर जुळलेली पत्रीका यात फार फरक असतो. पत्रिका जुळण्यापेक्षा दोन मन जुळण फार महत्त्वाच. वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या संस्कारात वाढलेले दोन जीव दोन मन एकसारखे असतीलच कसे? निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखे नाही तर मिळणारा जीवनसाथी अगदी १००% मनासारखा हवा तसा कसा मिळेल? त्यासाठी कॉम्प्रोमाईज फार महत्वाचे. आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळणं हे परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडत ठेवावे लागतं. तीच खरी यशस्वी जीवनाची कला आहे. एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत तरी ते मी स्विकारणार आहे का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन मगच संसार मांडायला हवा. आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारण हे या वाटेवरच पाहिलं यशस्वी पाऊल.ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं तर बाकी सहा पावलं सहज पडत जातात. मग ती साप्तपती तप्तपदी होत नाही. हेच यशस्वी संसाराचे खरे मर्

14/07/2017

आपल्या संस्कृतीत विवाह संस्काराचे अनन्यसाधारण महत्व आहे. देवादिकांपासून एखाद्या जवाबदार मध्यस्थाकडून विवाह जुळविले जात असत; असे ज्ञात आहे.
पुढे ही जवाबदार मध्यस्थांची भूमिका समाजात उत्तम वावर आणि संबंध असणा-या जेष्ठांकडे आली.
आज या धकाधकीच्या काळात ही जवाबदारी पूर्णतः आधुनिक संदर्भांसह स्विकारून, यापूर्वीच्या दोन आनोळखींना आयुष्यभरासाठी परस्परांची दृढ ओळख करून देता येण्याच्या दृष्टीने आणि पर्यायाने त्यांना सुयोग्य जोडीदाराची निवड करणे सुकर व्हावे या हेतुने मार्च २०११ मधे वैष्णवी वधु-वर सूचक केंद्राची सुरूवात करण्यात आली.
सराफ (कानडखेडकर) परिवाराचा सामाजिक वावर, सर्वदूर जिव्हाळ्याचे संबंध आणि तंत्रशुध्द व्यावसायिक दृष्टीकोन या सर्वांचा समाजातील विवाहोत्सुक अनुरूप मुला-मुलींना पर्यायाने त्यांच्या परिवारांना लाभ देता यावा या भावनेतून परिवारातील सौ. सीमा रत्नाकर सराफ यांनी हा महत्वाकांक्षी पुढाकार घेतला.
आज अनेक परिवार वैष्णवी वधु-वर सूचक केंद्राच्या या आधुनिक पध्दतीने आखलेल्या वधु-वर संशोधनाच्या सुविधेचा लाभ घेऊन पाल्यांसाठी अनुरूप जोडीदाराची निवड अगदी सहज करत आहेत ही खूप मोठी समाधानाची बाब आहे.

14/07/2017

आमच्या विषयी :
"लग्न " प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा, आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय म्हणा हवं तर. सगळं मनासारखं घडून आलं तर प्रत्त्येक दिवस म्हणजे जणू 'चैत्र -पाडवा ', नाहीतर आहेच.. आयुष्यभरासाठीचा 'वैशाख वणवा '. या लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात ;पण या विश्वातल्या लाखो करोडो माणसांमधून नेमकी आपली गाठ कोणाशी बांधली गेलीये हे शोधणं तितकंसं सोप्प नक्कीच नाही . या कठीण शोधमोहिमेत कोणीतरी 'वाटाड्या 'सोबत असेल तर.. ? सोप्प होईल ना काम ?
'वैष्णवी 'मध्ये आम्ही हेच तर करतो. तुमची ‘सुयोग्य जोडीदारासाठीची शोधमोहीम ' सुखकर आणि फलद्रुप व्हावी यासाठी प्रयत्न !
'वैष्णवी 'या आमच्या ऑनलाईन वधूवर सूचक मंडळामार्फत आम्ही मराठवाडा, विदर्भ, पुणे -मुंबई, हैद्राबाद, बंगलोर इतकेच नव्हे तर परदेशात वास्तव्यास असलेल्या ब्राह्मण समाजातील पदवीधर, उच्च शिक्षित उपवर तरुण-तरुणींना त्यांचा 'सुयोग्य जोडीदार ' शोधण्यात मदत करतो. आणि एकंदरीत विवाहसंस्था, लग्न, जोडीदारांची परस्पर अनुरूपता याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर 'विवाहपूर्व मार्गदर्शना' ची सोयही 'वैष्णवी 'मार्फत पुरवली जाते . हो ,आणि तीही अगदी विनामूल्य !
चला तर मग ,या वाटाड्याच्या सोबतीने करूया तुमच्या 'शोधमोहिमेला' प्रारंभ !

Mission/vision/
‘इहेमाविन्द्र सं नुद चक्रवाकेव दम्पती ।
प्रजयौनौ स्वस्तकौ विस्वमायुर्व्यऽशनुताम् ॥
(हे इंद्र देवा! आपण या नवीन विवाहित दांपतीला चक्रावाक पक्ष्यांच्या जोडीप्रमाणेच एकत्र आणा; त्यांना वैवाहिक जीवनाचा आनंद आणि संतती सुख लाभो . त्यांना संपूर्ण जीवनानुभव लाभो.)
विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यावर आमचा गाढ विश्वास आहे . अनुरूप जोडीदाराच्या साथीने केलेला संसार अतिशय सुख-समाधान देणारा असतो हे आम्ही स्वतः अनुभवलंय. पालक म्हणून ,उपवर मुलामुलींचे नातेवाईक म्हणून 'लग्न जुळवण्याचा 'क्लिष्ठ प्रक्रियेचा कडू -गोड अनुभवही आमच्या गाठीशी आहे. या अनुभवाचा फायदा इतरांनाही व्हावा आणि समाजाच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात तरी उतराई होता यावं इतकाच 'वैष्णवी 'हे आमचं ऑनलाईन वधूवर सूचक मंडळ सुरु करण्यामागचा उद्देश. सुयोग्य जोडीदाराच्या साथीने आमचा जीवनप्रवास जसा सुखमय झाला तसाच तो पुढच्या पिढीचाही होवो या साठीच हा प्रपंच !

Want your business to be the top-listed Furniture Store in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Chandra Pushp Apartment
Aurangabad
431001