5'S Consumer Hubs

5'S Consumer Hubs

Share

कोकणी उत्पादने आता 5’S Consumer Hubs मध्ये उपलब?

07/09/2020

सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे:

पोहे हा असा एक पदार्थ आहे, जो भारतात आवडीने खाल्ला जातो.पोहे हा एक भारतीय पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात.

‌ 1.शरीराला मिळते भरपूर ऊर्जा:- नाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते.

‌ 2. चविष्ट आणि पोषण तत्त्व:- कांदे पोह्यांच्या रेसिपीमध्ये आपण कित्येक प्रकारच्या भाज्या, शेंगदाणे आणि सुकामेव्याचाही वापर करतो. उदाहरणार्थ काजू, मनुके इत्यादी. या सामग्रीमुळे कांदे पोहे चविष्ट होतात.

‌ 3. शरीराचा आकार:- या डिशमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. कांदे पोहे खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात केल्यास तुमचे वजन वाढणार नाही. सोबत तुमच्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होतो.

‌ 4.पोट स्वच्छ राहते:- पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पोहे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. कारण पोहे हा फायबरयुक्त एक हलका पदार्थ आहे. पोह्यांची पचन प्रक्रिया हळूहळू होते. यामुळे शरीरामध्ये दीर्घकाळापर्यंत ऊर्जा टिकून राहते.

5.‌शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते:- पोह्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे. याच कारणामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात लोहाचा पुरवठा होतो, तेव्हा रक्त प्रवाहाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी देखील वाढते आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते.

हा लेख आपणास आवडला असेल तर आजच आमच्याकडे उपलब्ध असलेले सफेद साधे पोहे व लाल गावठी पोहे यांची मागणी नोंदवा.

असेच प्रोडक्ट घरबसल्या मिळवण्यासाठी व सदृढ आरोग्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
Mobile: 9892436870

03/09/2020

तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
किती जणांना पुरेल : 4 ते 5
साहित्य:
½ कप =60 ग्रॅम्स कुळीथ पिठी /कुळथाचे पीठ
2 मोठे कांदे - १८० ग्रॅम्स लांब व पातळ चिरून
½ कप खवलेला ताजा नारळ
तेल
पाणी
2 हिरव्या मिरच्या
5-6 लसणीच्या पाकळ्या
1 टीस्पून जिरे
2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
1 टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
1 टेबलस्पून मालवणी मसाला (मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला )
2-3 कोकम
मीठ

कृती:
1. सर्वप्रथम एका खलबत्त्यात जिरे , लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर कुटून त्यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सर वापरला तरी चालेल.
2. आता एका वाडग्यात कुळथाची पिठी घेऊन त्यात पाणी घालून सरसरीत पातळ करून घ्यावे. पाऊण कप पाणी घालून मी ही पिठी पातळ करून घेतली आहे.
3. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी , हिंगाची फोडणी घालून वाटलेला मसाला घालून घ्यावा. लसूण खरपूस होऊ द्यावी.
4. आता कांदा घालून तो मध्यम आचेवर चांगला करडा होऊ द्यावा. त्यात हळद आणि मालवणी मसाला घालून २ मिनिटे चांगला परतून घ्यावा .
5. कुळथाचे पीठ घालून घ्यावे आणि मसाल्यात चांगले ढवळून घ्यावे. गरज वाटेल तेवढे पाणी घालून पिठलं हवे तेवढे पातळ करावे. फार जास्त घट्ट आणि पातळ ठेवू नये. हे पिठले कोकणी घरांमध्ये भाताबरोबर जास्त खाल्ले जाते.
6. आपण ४ कप पाणी घातले आहे. मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर पिठल्याला चांगली उकळी येऊ देऊ. उकळी आली कि आच मंद करून झाकण घालून पिठलं शिजू देऊ.
7. ५ मिनिटे शिजवल्यावर पिठले घट्ट होऊ लागते. कोकम घालून झाकण न घालता अजून २ मिनिटे शिजू देऊ. पीठीचा कच्चेपणा दार झाला कि समजाव पिठले शिजले. आता खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून १ मिनिट शिजवून घेऊ.
8. पिठले तयार आहे . गरमगरम भाकरी किंवा भातासोबत वाढावे. सोबत एखादा पापड भाजलेला मिळाला कि क्या बात !

Want your business to be the top-listed Furniture Store in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400055